दरवाढ न दिल्यास1 जानेवारीपासून ऊसतोड आंदोलकांचे कोयता बंद आंदोलन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 14, 2020

दरवाढ न दिल्यास1 जानेवारीपासून ऊसतोड आंदोलकांचे कोयता बंद आंदोलन

सोमेश्वरनगर : साखरसंघ आणि कारखानदारांच्या संगनमतानं चौदा टक्के दरवाढ ऊसतोड मजुरांना दिली ती आम्हाला मान्य नाही. रात्रदिवस रानावनात राहून राबणाऱ्या आणि शौचालय, पाणी अशा मूलभूत सुविधा नसणाऱ्या मजूराला तुम्ही गुलामाची वागणूक देत आहात. 85 टक्के दरवाढ दिली नाही तर 1 जानेवारीपासून चालू फडात कोयता बंद आंदोलन करू, असा निर्धार आमदार सुरेश धस यांनी केला.

बारामती तालुक्यातील  सोमेश्वर व फलटण तालुक्यातीलक्यातील साखरवाडी कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या सभेत आमदार धस बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी घोडगंगा, भीमाशंकर, विघ्नहर याही कारखान्यांवर जाऊन मजुरांशी संवाद साधला. मजूरांना दरवाढीबाबत जागृत करण्यासाठी त्यांनी हा दौरा आयोजित केला असून 1 जानेवारीनंतरच्या कोयता बंद आंदोलनाची ते तयारी करत आहेत. मागील वेळी जाताना कोरोनाची तपासणी केली आता आणताना कोरोना कुठे गेला? पाच पाच दिवस मजूर, जनावरे अडवून ठेवली होती. आता कोरोनाचा वीमा का काढत नाही. बालमजुरीचे कायदे आमच्या लेकरांना आहेत का नाहीत? मजुरांची नोंदणी आहे का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

गोपीनाथराव मुंडे, बबनराव ढाकणेंनी मांडलेले ठराव मला अजून मांडावे लागतात ही खंत आहे. आमची पोर शाळेत घेत नाहीत. इथले जिल्हा परिषद शाळा, त्यांचे अधिकारी काय करतात. आमची मुले आणि आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत ना. मग पाकीस्तानातून आल्यासारखे आमच्या मुलांना इथली शिक्षण यंत्रणा का वागवते? मजुरांसाठी कायदे झाले पाहिजेत. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने याचा विचार करावा. मजुरांना प्यायला कॅनालच पाणी देतात. फिल्टर बसवायला काय अडचण आहे. माणुसकी आहे का कारखानदारांना ? या राबणाऱ्या ऊसतोड कामगारांना डिसेंबरपर्यंत भाववाढ दिली नाही तर 1 जानेवारीपासून चालू फडात कोयता बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

धस म्हणाले, चौदा टक्के भाववाढ ऊसतोड मजुरांना, मुकादमांनाही हे मान्य नाही. चौदा टक्केत बैलगाडीला प्रतिटन 29 रूपये मिळतात. वाहतूकीसह 374 मिळायचे. आता वाढीने 426 रूपये मिळणार आहेत. चार पाच माणस 18 तास काम करतात. मुलंबाऴ मदत करतात. तेव्हा दोन टनाचे 852 मिळतात. एका माणसाला दोनशे रूपये रोज मिळतात. पेंड, पत्र्या, टायर याचा खर्च होतो. त्याऐवजी 85 टक्के वाढ मिळाली तर मजुराला चौदाशे रूपये मिळतील. नुसत्या हार्व्सेटरवर कारखाना चालू शकत नाही. आमच्या हाताशिवाय तुमच जमत नाही. दरवाढ चांगली नसल्याने लेबर कमी पडली असल्याचे आमदार धस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment