मुंबई(प्रतिनिधी) : कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबईसह ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनचा अवलंब केला जाणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत सरकारी पातळीवरही विचार विनिमय सुरू आहे.
लॉकडाऊनबाबत ठाकरे सरकार "वेट ॲन्ड वॉच" या भूमिकेत असल्याची माहिती आहे. रोज हजारोच्या संख्येने कोरोग्रस्त रुग्ण वाढत आहेत. प्रत्येक दिवसाच्या आकडेवारीवर सरकार काटेकोरपणे नजर ठेवत आहे. पुढच्या 10 ते 15 दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यास सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.डिसेंबरमध्ये महापरिनिर्वाणदिन, दत्त जयंती आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखीनच वाढू शकतो. महापरिनिर्वाणदिनी लोकांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दत्तजयंती, नाताळ आणि नवीन वर्षासाठी खास नियमावली केली जाणार असल्याचे कळते.
No comments:
Post a Comment