बारामती:-संजय गांधी निराधार योजना अनुदानबाबत जाहीर सूचना बारामती तालुका व शहरातील सर्व संजय गांधी योजनेतील लाभार्थी यांना कळविण्यात येते की, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी विधवा योजना व इंदीरा गांधी अपंग योजनेतील सर्व पात्र व मंजूर असलेल्या लाभार्थींना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार सॊl यांचे सूचनेनुसार एकूण 1,76,61,400 रुपयाचे अनुदान पुणे जिल्हा मध्यवर्ती सह, बँकेच्या बारामती तालुक्यातील सर्वच शाखांमध्ये मा.तहसीलदार सॊl बारामती यांचे कार्यालयाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे. तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यासंबंधी आप आपल्या गावातील व वार्डमधील लाभार्थींना याची कल्पना देऊन त्यांना अनुदान मिळणेसाठी सहकार्य करावे व मदत करावी ही विनंती.कळावे,अशी सूचना श्री.संभाजी होळकर अध्यक्ष, बा.ता.रा.काँ,
श्री.इम्तियाज शिकीलकर अध्यक्ष,बा.श.रा.काँ.यांनी केल्या.
-----------------------------------------------------------
No comments:
Post a Comment