हप्ताचे 7 हजाराची लाच घेताना पकडले या अधिकाऱ्यास. पुणे (प्रतिनिधी):-7 हजाराची लाच घेताना शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकार्यास एसीबीने रंगेहात पकडले.आनंदा काजळे असे पकडण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजळे हे वानवडी विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीस आहेत. यादरम्यान लॉकडाऊन काळातला हप्ता न दिल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना हप्ता देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. यावेळी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली.त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यांनुसार आज वानवडी भागातील एका देशी दारूच्या दुकानात 7 हजार रुपयांची लाच घेताना काजळे यांना रंगेहात पकडण्यात आले असल्याने लॉकडाऊनच्या काळात दारू विक्री खुलेआम चालू होती की काय अशी चर्चा होती.
Post Top Ad
Wednesday, November 25, 2020
हप्ताचे 7 हजाराची लाच घेताना पकडले या अधिकाऱ्यास.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment