बारामतीच्या पालिकेवर काळे झेंडे,संतप्त झालेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांकडुन स्थानिक नेत्यांची खरडपट्टी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 14, 2020

बारामतीच्या पालिकेवर काळे झेंडे,संतप्त झालेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांकडुन स्थानिक नेत्यांची खरडपट्टी..


बारामती:- बारामती नगर परिषदेचे कर्मचारी सानुग्रह अनुदान मिळावे या मागणी साठी बारामती नगर परिषदे समोर दोन दिवस ठिय्या मांडून बसले होते.त्यांनंतर काल त्यांच्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वपूर्ण बैठक बोलावली होती.मात्र त्या बैठकी नंतर ही या कर्मचाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही.कर्मचाऱ्यांनी आंदोलन करते वेळी बारामती नगर परिषदेच्या मुख्य इमारतीवर चढत काळे झेंडे झळकवले होते.कर्मचाऱ्यांचा हा प्रचंड उद्रेक पाहता काल घडलेल्या प्रकारमुळे आता मला राज्यभर या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या बैठकित स्थानिक नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याची दबक्या आवाजात चर्चा करताना समजते.दिवाळी आधी सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल असं आश्वासन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते.मात्र प्रत्यक्षात बैठकी मध्ये सानुग्रह अनुदान देण्यावरून नगरसेवकांमधेच दोन मतप्रवाह असल्यामुळे हे सानुग्रह अनुदान रखडले असल्याची चर्चा काल दिवसभर कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळत होती.
बैठकी मध्ये असलेल्या नगरसेवकांच्या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहामुळे कर्मचाऱ्यांचा सानुग्रह अनुदानाचा प्रश्न तसाच खोळंबून राहिल्यामुळे काल संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगर परिषदेच्या मुख्य इमारतीवर चढत काळे झेंडे फडकावले.
त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषदे मधील काही महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली.मात्र या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे स्थानिक नेत्यांची चांगलीच शाळा घेत खरडपट्टी काढली.बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच आशा प्रकारे नगर पालिकेवर काळे झेंडे झळकवल्यामुळे अजित पवार पुरते घायाळ झाले असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीकडे लक्ष लावून बसलेल्या कर्मचाऱ्यांचा काल भ्रम निरास झाला.अजित पवारांनी घेतलेल्या बैठकी मध्ये ही तोडगा न निघाल्याने आचारसंहितेचे कारण देत आम्ही यंदा सानुग्रह अनुदान देऊ शकत नसल्याचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितल्या नंतर “एरवी संपूर्ण राज्याचे प्रश्न तातडीने सोडविणारे अजितदादा आज आमच्या सारख्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहेत.याची खंत आहे.आज आमच्या कर्मचाऱ्यांची हार झाली असली तरी देखील आम्ही सर्वसामान्य बारामतीकरांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी आमचे आंदोलन स्थगित करत असुन आम्ही पुन्हा एकदा कामावर रुजू होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment