आठ घरफोड्या करणाऱ्या व सोने व मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला अटक,बारामती शहर पोलीसांची दमदार कामगिरी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 15, 2020

आठ घरफोड्या करणाऱ्या व सोने व मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला अटक,बारामती शहर पोलीसांची दमदार कामगिरी

*आठ घरफोड्या व सोने व मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपींना अटक,बारामती शहर पोलीसांची दमदार कामगिरी*

बारामती : बारामती शहर व परीसरात एकूण आठ घरफोडी चोऱ्या करुन सोन्या -चांदीचे दागिने इतर साथीदाराच्या मदतीने लुटणाऱ्या आरोपीला बारामती शहर पोलासांनी अटक केली आहे. अटक केल्या केल्या नंतर त्याच्याकडून चोरीतील 2 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. बेरड्या उर्फ नियोजन संदीप भोसले (वय २८, रा. सोनगाव, ता. बारामती ) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

        याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ५०१/२०२० भा.द.वि कलम ३७९ मधील चोरीस गेलेल्या चंदनाचा व आरोपीचा शोध चालू असताना, आरोपी बेरड्या उर्फ नियोजन संदीप भोसले मळद गावच्या हद्दीत चंदनाची झाडे चोरण्यासाठी रेखी करीत असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने तेथे जाऊन पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले.

         त्याच्याकडे चंदन तोडण्यासाठी लागणारी कु-हाड, करवत, लोखंडी गिरमिट असे साहित्य मिळूून आले.त्यास चंदन चोरीचे गुन्ह्यात अटक करून तपास केला असता, आरोपी बेरड्या उर्फ नियोजन संदीप भोसले याने साथीदार गांगुली भोसले व इतर साथीदाराांसह बारामती शहर परिसरात एकुण ७ ते ८ घरफोड्या केल्याचे कबुली दिली. आरोपीकडून घरफोडीचे एकुण ८ गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने कि.रू २ लाख 62 हजार रूूपये किंमतीचा ऐवज हा जप्त करण्यात आलेला आहे.

          यामध्ये ६० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे नेकलेस १६ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या रिंगा, २१ हजार किंमतीची सोन्याची अंगठी , ६० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे गंठण, ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी , कानातील सोन्यचे जुबे ,१० हजार रुपये, किंमतीची एक सोन्याची अंगठी , ३० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे कानातील टॅप्स, २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र यासह इतर दागिने असा एकुण 2 लाख 62 हजाराचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.सदरची कामगिरी मा. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, शहरचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन शिंदे, मुकुंद पालवे, सौ अश्विनी शेंडगे, सहा. पोलीस उपनिरीक्षक संदीपान माळी, पोलीस हवालदार अनिल सातपुते, पोलीस नाईक तात्या साहेब खाडे, रुपेश साळुंके, अकबर शेख, रामदास जाधव, दादासाहेब डोईफोडे, पांडुरंग गोरवे, ओंकार सिताप, पो कॉ सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत, अतुल जाधव, नाथसाहेब जगताप, उमेश गायकवाड यांनी कामगिरी बजावली आहे.

  बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मारवाड पेठ कृष्णा डेअरी शेजारी निरंजनदिलीप पारख यांचे मोबाईल दुरूस्तीचे दुकानाचा दरवाजा उचकटून एकूण 41 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत 3,44,333/-रुपये चोरीस गेल्याची तक्रारी वरून 6 आरोपी व दोन अल्पवयीन बालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यातील तीन आरोपी फरार आहे तर माल हस्तगत केला असून तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment