१२ डिसेंबर रोजी "रुग्ण हक्क कायदा रथयात्रा" चे आयोजन
बारामती(प्रतिनिधी):-किडनीविकार, हृदरोग, मेंदूविकार, कॅन्सर, स्वाइन फ्लू, न्यूमोनिया सारखे रोग गरीब श्रीमंत सर्वांनाच होतात. आठ दहा लाख रुपये नसतील माणसाला मरावे लागते. पैसे असतील तर जगणार नाही तर मारायचं का? रुग्णांचा हा आक्रोश सरकारच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा लागू झालाच पाहिजे. म्हणून राज्य सरकारचे मार्गदर्शक या देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या जन्मदिनी १२ डिसेंबर २०२० रोजी "रुग्ण हक्क कायदा रथयात्रेची" सुरुवात पवार साहेबांचे निवासस्थान गोविंदबाग ते मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बांद्रा अशी काढली जाणार आहे.
बारामती जि. पुणे ते मातोश्री, बांद्रा, मुंबई या रथयात्रा प्रवासादरम्यान नीरा, जेजुरी, सासवड पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मावळ, लोणावळा, पनवेल, खोपोली, कल्याण, डोंबिवली, ठाणे मुंबई येथे ७५ सभांचे ठिक-ठिकाणी आयोजन केले जाणार आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत महिती देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण बारामती येथे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
असे आवाहन रुग्ण हक्क परिषद, बारामती तालुका कमिटीच्या वतीने करण्यात आले.
No comments:
Post a Comment