कंगना रणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
मुंबई(प्रतिनिधी) : देशात सध्या या ना त्या कारणावरून बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रणावत चर्चेत आहे. ती नेहेमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. कंगणा तिच्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.
कंगणाने हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी तिला समन्स बजावले होते.
कंगणाचे ट्विटर कोण चालवते? का कंगणा स्वतः ट्विट करते, याबाबत आता चौकशी केली जाणार आहे. कंगणा सोबतच बहिण रंगोली हिची देखील चौकशी केली जाणार. कंगना रणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
No comments:
Post a Comment