जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी
पुणे- जिल्हाधिकारी तथा शिक्षक व पदवीधर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पहाणी केली. त्यांच्या समवेत उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी मतदान केंदात उपलब्ध सुविधा, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर केंद्रावर निर्माण करावयाच्या सुविधा (सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, बसण्याची व्यवस्था) याबाबत माहिती घेतली. पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment