ब्लॅकमेल केले जात असल्याने सुसाइड नोट लिहून मुलाने केली आत्महत्या...
लखनऊ दि.22 : गेल्या अनेक दिवसांपासून देशात आत्महत्याच्या घटना वाढत आहे. सातत्याने येत असलेल्या आत्महत्यांच्या बातम्यांमुळे नागरिकांनी चिंता वाढली आहे. या प्रकरणात सरकारलाच योग्य ते पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अशातच उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील प्रतापगढमध्ये आयटीआय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विद्यार्थी मानसिक त्रासातून जात होता, त्यातच
त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.तातडीने या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.यावेळी घटनास्थळी केलेल्या तपासात विद्यार्थ्याची सुसाइड
नोट सापडली आहे. आता पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेलहा गावात जोखू लाल वर्मा यांचा 20 वर्षांचा मुलगा धीरेंद्र हा प्रतापगढमध्ये आयटीआयचं प्रशिक्षण घेत होता. शनिवारी सुट्टीच्या दिवशी तो गावी आला होता. त्यादिवशी संध्याकाळी तो
आपल्या घराच्या दुसर्या मजल्यावरील एका खोलीत गेला.आणि खोली बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली.दुपारी त्याची आई शेतावरुन आल्यानंतर तिने धीरूला जेवणासाठी आवाज दिला. मात्र त्याच्याकडून प्रत्युकत्तर न मिळाल्याने ती वर गेली. तिने दार ठोठावल्यानंतरही कोणी दार उघडत नाही हे पाहून तिला भीती वाटली. तिने खिडकीतून पाहिलं तर तिचा 20 वर्षांचा मुलगा छताला लटकलेला दिसला. याचा त्या माऊलीला जबरदस्त धक्का बसला आहे. पोलिसांना मृतकाकडे एक सुसाइड नोट मिळाली आहे. यामध्ये विद्यार्थ्याने आत्महत्येसाठी गावातील हीरा सिंह आणि त्याचा मेव्हणा भीष्म सिंह यांना सातत्याने ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप केला आहे.सुसाइड नोटमध्ये विद्यार्थ्याने वडिलांना भावनिक पत्र लिहिलं आहे, यामध्ये तो म्हणतो की, मी भ्याड नाही..पण आरोपी मला सतत ब्लॅकमेल करीत आहेत. त्यामुळे मी
आत्महत्या करतोय..सारी बाब...या प्रकरणात विद्यार्थ्याच्या वडिलांनी आरोपींना यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा होण्याची मागणी केली आहे. यानंतर पोलिसांच्या टीमने पीडितेच्या कुटुंबाची चौकशी केली आहे. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला असून त्यामार्गाने तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment