ऊसतोडणी कामगारांची कोव्हिड-१९ची तपासणी करण्याची मागणी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 20, 2020

ऊसतोडणी कामगारांची कोव्हिड-१९ची तपासणी करण्याची मागणी.

*ऊसतोडणी कामगारांची कोव्हिड-१९ची तपासणी करण्याची मागणी*.                          बारामती:- तालुक्यातील साखर कारखान्याचे ऊसतोडणी करणा-या कामगारांची आरोग्या तपासणी करण्याची गरज आहे,साखर कारखान्याने व मुकादम हे स्वताच्या स्वार्थासाठी ऊसतोडणी कामगाराचे रक्ताचे पाणी होई पर्यंत कष्ट घेत आहेत पण त्यांच्या सुख दु:खामध्ये कोणीच त्याच्या मदतीला धावत नाही.त्याची अल्पवयीन मुले सुध्दा मोलमजुरी करताना दिसतात पण त्यांच्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष का होते हा मोठा गंभीर प्रश्नच आहे.तसेच कोव्हिड _१९चे संकट हे आपल्या देशावर आले आहे , त्यामुळे पोटासाठी वन वन फिरणा-या ऊसतोडणी कामगार,ऊसवाहतुक करणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची कोव्हिड -१९ची तपासणी करूनच ऊस तोडण्यास  सुरुवात करावी व ह्याची पहाणी करण्यासाठी बारामती तालुक्यातील संरपच, पोलिस पाटील,व तलाठी यांच्या मार्फत चौकशी करून साखर कारखान्या कडुन कामगारांची यादी घेऊन वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने काम करावे,त्याचा अहवाल संधीत अधिकारी यांना कळवावा    कोव्हिड -१९ मुळे अनेक लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे .या प्रकरणाची दखल घेऊन साखर कारखान्याना नोटीस बजवावी अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र महाडिक व बारामती तालुका अध्यक्ष अस्लम शेख यांनी प्रांन्त अधिकारी व तहसीलदार बारामती यांना केली आहे.

No comments:

Post a Comment