जिल्ह्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता .. पुणे : समुद्र एकाचवेळी दोन कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तामिळनाडूसह इतर राज्यात २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसला तरी राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.अरबी आणि बंगालचा उपसागरात दरम्यान, राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३५.३ अंश सेल्सियस तर सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १५.९ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.राज्यातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर ,सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात आज तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शुक्रवारी पुणे ५.१, लोहगाव २२.४, गोंदिया ११
नागपूर येथे ३.३ मी मी पावसाची नोंद झाली
आहे. कोकण गोवा, मराठवाडा आणि
विदर्भात हवामान कोरडे राहील. विदर्भातील
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, या जिल्ह्यात बुधवारी हलका ते मध्यम
पावसाची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment