सावकारी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर.. बारामती:-गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या सावकारी प्रकरणात अटक झालेले शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना आज जामीन मंजूर झाला असून याबाबत सविस्तर असे की बारामती मधील प्रितम शहा यांच्या आत्महत्या प्रकरणी बारामती शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तीवर
गुन्हा दाखल झाला होता. अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्वाना न्यायालायने जामिनावर मुक्त केले आहे. बारामती शहरातील प्रितम शहा लेंगरेकर यांना व्याजाच्या
पैशासाठी त्यांचं घर लिहून घेतल्यामुळे आणि मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी जयसिंग उर्फ बबलू देशमुख, जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी,प्रवीण दत्तात्रय गालिंदे, सुनील उर्फ सनी आवाळे यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींकडे आता कोणताही तपास उरला नाही. या शिवाय पैशांची देवाण घेवाण हा व्यवहार होता याला सावकारी कसे म्हणता येईल इत्यादी मुद्यावर आज बारामती सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने.. डीडी शिंदे, राजेंद्र काळे, सचिन वाघ, भार्गव पाटसकर यांनी बाजू न्यायालयात मांडल्याने जामीन मंजूर झाला.
No comments:
Post a Comment