तर उर्जामंत्र्याला आरपीआय चा पँथर स्टाईल झटका देऊ. डॉ राजन माकणीकर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

तर उर्जामंत्र्याला आरपीआय चा पँथर स्टाईल झटका देऊ. डॉ राजन माकणीकर

तर उर्जामंत्र्याला आरपीआय चा पँथर स्टाईल झटका देऊ. डॉ राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) लॉकडावून काळातील नागरिकांचे वीजबिल माफ नाही केल्यास उर्जामंत्र्याला डेमोक्रॅटिक आरपीआय पँथर स्टाईल झटका देईल असा गंभीर इशारा पक्षाचे केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला आहे.
लॉककडावून काळात हालाकीचे जीवन जगत असतांना कुठे आता तरी काही अंशी जनता कामाला लागली आहे, मात्र पोटाचा प्रश्न अद्यापही निवळला नाही, आणि त्यात विद्युत बिले भरायच्या नोटीशी आणि वीजपुरवठा बंद करण्याच्या सूचना वजा धमक्यांना जनता हवालदिल झाली आहे.
आर.पी.आय डेमोक्रॅटिक सर्वप्रथम सरकारच्या या धोरणाचा जाहीर निषेध व्यक्त करत असून विजपुरवठा बंद करणाऱ्या अधिकाऱ्यास व ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांना  पँथर स्टाईल झटका देऊ असा गंभीर इशारा डॉ माकणीकर यांनी दिला आहे.
बेरोजगारीने परेशान व हतबल झालेला युवावर्ग व त्याचा परिवार आत्महत्या करत आहे, स्वतःला फासावर लटकवत आहेत, मात्र: अति तेथे माती असते, यादी राखा हाच परेशान झालेला वर्ग सरकारला फासावर लटकवेल, याद राखा, गुमान वीजबिल माफ करा, व पोटाला चिंमटा काढून लॉकडाऊन काळातील आजपर्यंतचे भरलेले बिल परत करा किंवा खाते जमा ठेवा व ज्यांनी भरले नाहीत त्यांच्याकडून वसुली करू नका अस दमही आर.पी.आय डेमोक्रॅटिक च्या वतीने डॉ माकणीकर यांनी सरकार व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला प्रसिद्धीपत्रकाद्वारे भरला आहे.
 जर सरकारने त्यांच्या धोरणात बदल नाही केल्यास होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी नेतृत्वात राज्य महासचिव कप्तान श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो कार्यकर्ते सरकारला काळे झंडे दाखवून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करणार असल्याचीही माहिती डॉ. माकणीकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment