सतीश चव्हाण यांचा विजय ही काळ्या दगडावरील रेघ...
आ. प्रकाश दादा सोळंके
औरंगाबाद:-औरंगाबाद पदविधर महाविकास आघाडी चे उमेदवार आ. श्री. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज माजलगाव येथे आमदार श्री. प्रकाश दादा सोळंके यांनी मतदार बांधव यांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते.
सतीश चव्हाण हे उच्च शिक्षीत उमेदवार आहेत. ते सर्व सामान्य कुटुंबातुन आलेले आहेत. पदवी चे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी बांधकाम क्षेत्रात चांगले काम करून प्रगती केली. व्यक्तिगत जीवनात आपण व्यवसाय करणे चुकिचे नाही. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत. या माध्यमातून त्यांनी शाळा, काॅलेज, साठी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
मराठवाड्यातील गरिब विद्यार्थी यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
मराठवाड्यातील विद्यार्थी बांधवावर अन्यायकारक असलेला मेडिकल प्रवेश ७०\३० चा फाॅरमुळ्या मुळे विद्यार्थी यांच्या वर अन्याय होत होता. हा फाॅरमुला रद्द करण्यात यावा यासाठी वारंवार विधानभवन मध्ये अधिवेशनात आवाज उठवुन हा फाॅरमुला कायमचा रद्द केला.
भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची मुंबई येथे व्यवस्था केली. या साठी स्वतंत्र यंञणा मुंबई येथे कार्यरत आहे.
भाजपचा उमेदवार हा घोटाळे बाज आहे. त्यांची कारनामे वर्तमानपत्र मध्ये छापून आलेली आहेत. या मुळे अशा घोटाळेबाज उमेदवार व इतर भाजपचे बंडखोर उमेदवार यांना मतदान न करता. सतीश चव्हाण यांना १ क्रमांक असलेले बटन दाबून विजयी करा.
सध्या भाजप वाले चर्चा करतात की हे सरकार लवकरच पडेल. पण त्यांना सांगु इच्छितो की आमच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी ध्येय एकच आहे. हे सरकार ५ वर्ष तर पुर्ण करेलच व पुढील १० वर्षे देखील हेच सरकार येईल .
मतदार संघात गेल्या ५ वर्षात रखडलेले प्रकल्प लोणी सावंगी, तारूगव्हाण बंधारा, अप्पर कुंडलिका याचे काम एका वर्षात मार्गी लावले. याच बरोबर मतदारसंघातील गावाच्या विकासासाठी २५\१५ अंतर्गत १५ कोटी व दलित वस्ती अंतर्गत १० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला.
सतेत आल्यानंतर ५\६ महिन्यात ३० लाख शेतकर्याचे २ लाखापर्यंत सरसगट कर्ज कुठलीही अट न ठेवता माफ केले. कोरोनाचे संकट असताना देखील. चक्रीवादळ व अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या शेती साठी हेक्टरी १० हजार रुपये मदत जाहीर केले .व वाटप देखील चालु आहे.
तसेच मतदारसंघा साठी सर्व समाज घटकांसाठी बघितलेले स्वप्न लवकरच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल.
या वेळी महाविकास आघाडी चे उमेदवार श्री सतीश चव्हाण यांना सामाजिक संभाजी ब्रिगेड या संघटनेने लेखी पञाद्वारे पाठींबा जाहीर केला.
या वेळी उपस्थित माजी आ.राधाकृष्ण आण्णा होके, मोहनराव काका सोळंके, बाबुरावजी पोटभरे, अशोकराव डक, जयसिंह भैय्या सोळंके, कल्याण आबुज,मिलिंद आव्हाड, संभाजी शेजुळ, मंजूर शेख, माधव निर्मळ,चंद्रकात शेजुळ, लालासाहेब तिडके, औदुंबर सावंत नासेर पठाण, राजेश घोडे, राकेश साळवे, बजरंग साबळे, रमेश सोळंके, आप्पासाहेब जाधव, हरिभाऊ सोळंके, संदिप माने, पांडुरंग मस्के,ईश्वर मुंडे, विश्वभंर थावरे, कचरू खळगे, NT सोळंके, बळीराम आजबे, दिनेश मस्के, वसीम मनसबदार, हंनुमंत नागरगोजे. adv भास्कर उजगरे महिला जिल्हाध्यक्ष तुपसागर ताई, संध्या भांडेकर नगसेवक, पदाधिकारी व पदविधर मतदार उपस्थित होते...
No comments:
Post a Comment