बारामती दि. 14:- देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये नायब तहसिलदार श्री. महादेव भोसले यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी श्री. विलास बडगे, सागर साबळे तसेच तहसिल कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
०
No comments:
Post a Comment