भारतीय नौदलात खळबळ; महिला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून घेतलं चुंबनया प्रकरणात महिला अधिकाऱ्याने आर्म फोर्सेस ट्रिब्युनलचं दार ठोठावलं आहे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 14, 2020

भारतीय नौदलात खळबळ; महिला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून घेतलं चुंबनया प्रकरणात महिला अधिकाऱ्याने आर्म फोर्सेस ट्रिब्युनलचं दार ठोठावलं आहे

नवी दिल्‍ली, 14 नोव्हेंबर : भारतीय नेव्ही अकॅडमीमधून (INA) बरखास्त केल्यानंतर एक महिला अधिकारी कॅडेटने आर्म फोर्सेस ट्रिब्युनलचं दार ठोठावलं आहे. एका पुरुष कॅडेटने महिला कॅडेटच्या केबिनमध्ये जाऊन तिचं चुंबन घेतल्याचा प्रकार येथे समोर आला आहे.  कॅडेटने दिलेल्या माहितीनुसार तिला कडक आणि भेदभावपूर्ण शिक्षा देण्यात आली. या प्रकरणात तर पुरुष कॅडेटला साधी शिक्षा देऊन सोडण्यात आलं.

ही घटना या वर्षाच्या मार्च महिन्यातील आहे. महिला कॅडेटच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुष कॅडेटने महिलेच्या केबिनमध्ये जाऊन तिला किस केलं होतं. महिला कॅडेटचं म्हणणं आहे की, या गुन्ह्यासाठी पुरुष कॅडेटला साधी शिक्षा सुनावण्यात आली. तर तिला मात्र कडक शिक्षा देण्यात आली आहे. ही महिला कॅडेट नेव्हल अकॅडमीमध्ये शॉर्ट सर्विस कमिशनसाठी 'नेवल ओरिएंटेशनचा कोर्स' करीत होती.                                                 महिला कॅडेटचा दावा...

महिला कॅडेटच्या वकिलांनुसार 29 मार्च रोजी पुरुष कॅडेट तिच्या क्लाइंट केबिनमध्ये आला होता आणि तिचं चुंबन घेऊन निघून गेला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला अपेक्षेनुसार शिक्षा देण्यात आली नाही. त्याचं रेलिगेशन करण्यात आलं नाही. वकिलांनी आणखी एका प्रकरणाचा हवाला दिला. ज्यात अन्य कॅडेट्सना अत्यंत साधी शिक्षा देण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, महिला कॅडेटला पुढे शिक्षण सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यायला हवी. कारण महिलेने अकॅडमिक्स, फिजिकल ट्रेनिंग आणि स्विमींग टेस्टमध्ये चांगली कामगिरी दाखवली आहे.

नौसेनाचं काय आहे म्हणणं..

नौसेनाने या प्रकरणात काहीही सांगण्यास नकार दिला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणताही भेदभाव किंवा लैंगिक भेदभाव झालेला नाही. तर दोन्ही कॅडेट्सचं डिमोशन झालं आहे. तर दुसऱ्या एका सूत्रांनी सांगितल्यानुसार ही महिला कॅडेट्सच्या विरोधात दुसरी शिस्तभंगाची कारवाई आहे. तिला गेल्या वर्षी लिखित परीक्षेत चुकीच्या साधनांचा वापर करीत असताना पकडलं होतं. नियमांनुसार तिला एका टर्ममध्ये दोन रेलिगेशन्समुळे बाहेर काढण्यात आलं होतं. AFT ने याबाबत सांगितलं की, सध्या तक्रारकर्त्याला सेवेत रुजू करावे याबाबत आम्ही सहमत नाही. मात्र महिला कॅडेटला ट्रेनिंग नेव्हीच्या ड्यूटीतून हटविण्याचा आदेश जर असेल तर तो अंतिम निर्णय असल्यास रोखण्यात यावा.

No comments:

Post a Comment