तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच गोळीबार.. बारामती:-बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे तपास कामासाठी फलटण येथे गेले असता त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजते.खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ लांडे हे एका तपास कार्यात फलटण तालुक्यात गेले असता, तेथील संशयित
आरोपींकडून छर्याच्या बंदुकीतून त्यांच्यावर
गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात लांडे हे सुदैवाने थोडक्यात बचावले.त्यास वरिष्ठ अधिकार्यांनी दुजोरा दिला असून अधिक माहिती मिळू शकली नाही.तपास चालू असल्याचे समजले.
No comments:
Post a Comment