प्रेस' लिहिलेल्या गाडीमधून करीत होते असे धंदे. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

प्रेस' लिहिलेल्या गाडीमधून करीत होते असे धंदे.

'प्रेस' लिहिलेल्या गाडीमधून करीत  होते असे धंदे.                                                                                                                        पुणे,(प्रतिनिधी):-पुण्यात नुकतंच गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा तस्करीच्या प्रकरणात 2 जणांना अटक केली आहे. मुख्य म्हणजे या गांजा तस्करीसाठी प्रेस' लिहिलेल्या गाडीचा वापर केला जात होता.गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने कारवाई करत दोन जणांना बेड्या ठोकल्यात.यांच्याकडून एकूण साडेनऊ लाखांचा 37 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय.पोलीस नाईक सचिन जाधव यांना विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा तस्कर येणार असल्याचा सुगावा लागला होता. त्यांनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने टाटा इंडिगो गाडीवर छापा टाकला. यामध्ये गाडीचा चालक रवींद्र आणि त्याचा साथीदार गोरक्षनाथ याला ताब्यात घेण्यात आलंय. या गाडीची तपासणी केली असता त्यात असलेल्या गोण्यांमध्ये गांजा सापडला. ताब्यात
घेण्यात आलेल्या या दोन आरोपींवर यापूर्वी
दारू विक्रीचा देखील गुन्हा असल्याचं समोर
आल्याचे समजते.

No comments:

Post a Comment