कोंडवीसे लेणी परिसरात अतिक्रमन(?)
*लुप्त होनारी भग्नावस्थेतील लेणी जतन करणार.*
मुंबई दि (प्रतिनिधी) अंधेरी कोंडवीसे लेणी परिसरात प्रचंड अतिक्रमण करण्यात आले असून ही अतिक्रमणे तात्काळ उठविण्यात यावीत व लुप्त होत असलेल्या लेणीचे अवशेष जतन करावे अन्यथा पुरातत्व विभागासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा रिपाई डेमोक्रॅटिक व पँथर ऑफ सम्यक योद्धा चे केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
अंधेरी पूर्वेला कोंडीविसे नावाची लेणी असून इथे हजारो पर्यटक भारताचा इतिहास व प्राचीन बौद्ध संस्कृती पाहवयास येतात, याच लेणी परिसरात म्हशीचे तबेले, गॅरेज, तर ट्रक पार्किंग सारखे व्यवसाय अनाधिकृतरीत्या केले जात आहेत, स्थानिक प्रशासनाच्या अकार्यक्षमते मुळे अतिक्रमण धारकांना शह मिळत आहे.
याच लेणीच्या डोंगराला सलग 100 मीटर जवळ काही लेण्यांचे भग्न अवशेष पहावयास मिळाले आहेत, सदर अवशेषांचे निरीक्षण करावे व सरकार दरबारी नोंद घेऊन सदरचे अतिक्रमण तात्काळ उठवावे अश्या मागणीचे पत्र पुरातत्व खाते व मुंबई पोलीस आयुक्त तथा उपायुक्त बृहन्मुंबई के-पूर्व प्रभाग यांना देण्यात आले आहे.
रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, पँथर ऑफ सम्यक योद्धा, दि बुध्दांज बोधी ट्री व सम्यक मैत्रेय फौंडेशन या पक्ष संघटना व संस्थेने तक्रार व मागणी अर्ज केले असून कारवाई नाही झाल्यास उग्र आंदोलन छेडु असा इशारा डॉ माकणीकर व कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी दिला आहे.
लेणी परिसरात भग्नावशेष असल्याची माहिती मिळताच डॉ राजन माकणीकर यांनी पूज्य भदंत शिलबोधी यांना बोलावून कॅप्टन श्रावण गायकवाड व गणेश गायकवाड यांनी परिसराची पाहणी केली, यावेळी अनाधिकृतरीत्या गॅरेज, डेंटिंग पेंटिंग, पाण्याचे बोअरवेल असे दुकाने थाटली असल्याचे निदर्शनात आले असून लेणी संवर्धनासाठी वेळोप्रसंगी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना घेराव घालू असाही मनोदय यावेळी संघटना व पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
लेणी प्रेमी व इतिहास अभ्यासक आणि उपासक उपसकांनी या स्थळाला भेटी देऊन जनजागृती वाढवावी अतिक्रमण उठवावे व सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी आवाज उठवावा आणि गरज पडली तर श्रमदानातून लेणी वाचविण्यास पुढे यावे असे आवाहन पूज्य भदंत शिलबोधी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment