बारामती,दि.१३: बारामतीत सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू असल्याने बारामतीकरांना चर्चेचा विषय झाला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर बारामती नगरपरिषदचे कर्मचारी यांना काळे झेंडे घेऊन चक्क इमारतीवर चढून आंदोलन करण्याची ही वेळ यावी,ते पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामतीत दुसऱ्यांदा नगरपालिकेवर काळे झेंडे फडकल्याचं पाहायला मिळालं.
नगरपालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बोनस मिळावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे.आज (शुक्रवार) आंदोलनाचा दुसरा दिवस असून त्यांनी नगराध्यक्षा किंवा नगरसेवकांपैकी कोणीही भेटायला आलं नाही. त्यामुळे नगरपालिका कर्मचारी आणखी संतप्त झाले. त्यांनी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे फडकवून आंदोलन केलं. घोषणाबाजी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काल या कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आल आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्यानं दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका
कर्मचाऱ्यांनी घेतली .
No comments:
Post a Comment