धनगर समाज आरक्षण मोटर सायकल रॅली चे बारामती मध्ये स्वागत. इंदापूर, बारामती येथे आमदार यांना दिले निवेदन..
बारामती- धनगर समाज अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे, या मागणीसाठी सकल धनगर समाज यांच्या वतीने मराठवाडा विभागाचे विष्णू सायगुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोटर सायकल रॅली काढली. महाराष्ट्रातील 288 आमदारांना भेटून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा टप्पा याची सुरुवात पंढरपूर येथील तीर्थक्षेत्र विठ्ठल मंदिरापासून झाली आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आमदारांना हे निवेदन देण्यात आले .तसेच बारामती या ठिकाणी विष्णू सायंगुडे यांचे स्वागत सकल धनगर समाजाच्या वतीने कल्याणी ताई वाघमोडे व सर्व समाजबांधव यांनी केले .यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नेते सुधाकर पांढरे, गोविंद देवकाते, ॲड. अमोल सातकर डॉ. नवनाथ मलगुंडे, डॉ. सुजित वाघमोडे, बापूराव सोलनकर, सचिन गडदे , गणेश कोकरे,चंद्रकांत वाघमोडे, दशरथ आबा राऊत,संपत टकले, बह्मदेव कोकरे, जगदीश कोळेकर, सुहास टकले, नरेन्द्र देवकाते, आदी अनेक समाज बांधव उपस्थित होते.
बारामती येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना त्यांचे प्रतिनिधी , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
तसेच इंदापूर चे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन धनगर आरक्षण मुद्दा मार्गी लावण्या बाबत निवेदन देण्यात आले.धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा विष्णू सायंगुडे यावेळी व्यक्त केली.यावेळी विष्णू सायगुंडे, कल्याणी वाघमोडे, बापूराव सोलनकर, चंद्रकांत वाघमोडे, डॉ. सुजित वाघमोडे, अमित शिंदे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment