पुणे, दि.25 :- शिक्षक व पदवीधर निवडणूक 2020 साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुस-या मजल्यावर उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्या कार्यालयात तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, तक्रार निवारण कक्ष श्रीमती आरती भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.मतदारांना काही तक्रारी असल्यास दूरध्वनी क्र.020-26137233,23137234 व 26137235 या क्रमांकावर अथवा tgelection2020@gmail.com या ईमेल पत्त्यावर नोंदवाव्यात.
*जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन*
No comments:
Post a Comment