सकृतदर्शनी पुरावा नसताना FIR तर दुसर्यात तथ्य नसताना गुन्हा दाखल केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबीत - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

सकृतदर्शनी पुरावा नसताना FIR तर दुसर्यात तथ्य नसताना गुन्हा दाखल केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबीत

सकृतदर्शनी पुरावा नसताना FIR तर दुसर्यात तथ्य नसताना गुन्हा दाखल केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबीत
पिंपरी (प्रतिनिधी)दि.19:-– पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चिंचवड पोलिस ठाण्यात यापुर्वी कार्यरत असणार्या आणि सध्या नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणार्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने आपल्या बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचे दर्शनच जणू घडवून आणल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका गुन्हयात सकृतदर्शनी पुरावा नसताना तर दुसर्यात तथ्य नसताना गुन्हे दाखल केल्याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. निलंबनाचा आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढला आहे.

काही दिवसांपुर्वी चिंचवड पोलिस ठाण्यात कार्यरत असणार्या रवींद्र जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. दरम्यान, ज्यावेळी रवींद्र जाधव हे चिंचवड पोलिस ठाण्यात कर्तव्यास होते त्यावेळी त्यांनी बेजबाबदारपणे दोन गुन्हे दाखल केले असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दि. 19 ऑक्टोबर 2020 रोजी एका विनयभंगाच्या गुन्हयात सकृतदर्शनी पुरावा नसताना देखील त्यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली. त्याच दिवशी सरकारी कामात अडथळा अन् मारहाण केल्याचा एक गुन्हा दाखल करून सुर्यास्तानंतर एका महिलेला अटक केल्याचे प्रकरण आहे. दरम्यान, जाधव यांच्या झालेल्या चौकशी त्यांनी बेजबाबदार वर्तन केल्याचे आणि निष्काळजीपणा केल्याचे समोर आल्याने त्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.

No comments:

Post a Comment