10 डिसेम्बरला आझाद मैदानात रिपाई डेमोक्रॅटिक चा मोर्चा
मुंबई दि 7(प्रतिनिधी):- देशासह राज्यात संविधानाची पायमल्ली होऊन विचारसरणी तोंड वर काढत असल्यामुळे महिला, बौद्ध, ओबीसी, अल्पसंख्यांक व मुस्लिम असुरक्षित झाले आहेत या व अन्य प्रश्नावर 10 डिसेम्बर गुरुवारी आझाद मैदानवर रिपाई डेमोक्रॅटिक चा मोर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.
पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या आदेशावरून मुंबईतील युवा शक्ती एकवटून स्वयं पुढाकाराने राष्ट्रीय सचिव विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो कार्यकर्त्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारी आरक्षण संपवून व कंत्राटी पद्धती सुरू झाल्या मुळे
बेरोजगारी वाढली असून खाजगी नोकरभरतीत आरक्षण ठेवणे आवश्यक आहे.
लॉकडावून मधील सर्वांचे विद्युत बिले माफ करावे ज्यांनी भरलेत ते बिले पुढील बिलात कपात करावेत किंवा परतावा करण्यात यावा.
बौद्ध, मुस्लिम व महिलांवरील वाढते अत्याचार, बलात्कार व मारहाण, त्या केसेस व सुनावणी तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन न्यायदान लवकर व्हावे.
मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न लवकर सोडवावा.
मूळ कोळीवाडे गावठाण्यांचे सीमांकन करून गावचे नकाशे तयार करून प्रत्येक घराला मालमत्ता पत्रक देने.
नवी मुंबई विमानतळ निर्माणात वाघिवळीवाडा बौद्ध लेणी चोरीला गेली, तिचा तपास करून तशीच लेणी विमानतळाच्या आजूबाजूला बांधून द्यावी, चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे.
विमानतळ निर्माण कार्यात ज्या ज्या गावचे पुनर्वसन करण्यात आले त्या गावांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवून ज्याच्या घरांचे पुनर्वसन झाले नाही त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे.
पवई येथील विहार लेक परिसरातील अनाधिकृतरीत्या बांधलेली लॉजिंग बोर्डिंग वर चाललेला वासनेचा बाजार बंद हिंदू संस्कृती वाचवावी.
अंधेरी एमआयडीसी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करावे पात्र असूनही अद्याप सदनिका नाही मिळालेल्या वंचित झोपडीधारकास न्याय मिळवून द्यावा.
लोकडावून मूळे विविध संस्था व बँकांचे कर्ज परतफेडीसाठी जनतेला आर्थिक बाजू मजबुतीसाठी व कर्ज परतफेडीसाठी एप्रिल पर्यंतचा वेळ द्यावा, सक्तीची कर्जवसुंली थांबवावी.
इंदू मिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे व समुद्रातील छत्रपती शिवरायांचे स्मारकाचे काम जलदगतीने चालू करावे.
ऑनलाईन शिक्षण चालू असले तरी विदयार्थी मोबाईल व इंटरनेट मुळे शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईल व इंटरनेट सेवा मोफत पुरविण्यात यावी.
बौद्ध व शूद्र म्हणवणाऱ्या बांधवावर वाढते जातीय अत्याचार पाहता त्यांना बंदूक परवाना मिळवून द्यावा.
आगामी होणाऱ्या सर्व निवडणुका या ईव्हीएम मशीन द्वारे न घेता ब्यालेट पेपर द्वारे घ्यावें.
डिजिटल मीडिया म्हणजेच वेब पोर्टल यु ट्यूब या प्रसार माध्यंमांना सरकार तरफे नोंदनि करून त्यांना अधिकृत परवाने देण्यात यावे.
शेतकरी, बेरोजगार तरुण व महिलांना आर्थिक मानसिक व शारीरिक सक्षम करण्यासाठी कठोर पाऊले उचलून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी.
भारतीय संविधान हा विषय माध्यमिक शालांत अभ्यासक्रमात समाविस्ट करण्यात यावा.
26 नोव्हेबर संविधान दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून घोषित कारण्यात येऊन या दिवशी संविधान निर्मात्यांचे गुणगान करण्यात यावे, हा दिवस कसा साजरा करण्यात यावा यासंबंधी आचारसंहिता बनवण्यात यावी.
आरे परिसरातील झोपडपट्टी वाशीयांच्या मूलभूत प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून स्वच्छ पांनी व विद्युत कनेक्शन देण्यात यावेत.
या व अन्य मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनाचे अवचित्य साधून कनिष्क कांबळे यांच्या आदेशावरून राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा सचिव विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष कॅ. श्रावण गायकवाड यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.
शेकडो कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून हे आंदोलन पार पाडणार असल्याची माहिती डॉ. माकणीकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment