31 डिसेंबर रोजी खऱ्या अर्थाने होईल का अवैद्य दारू विक्रीवर कारवाई ..कारण दारू विक्री होतेय बारमाई..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

31 डिसेंबर रोजी खऱ्या अर्थाने होईल का अवैद्य दारू विक्रीवर कारवाई ..कारण दारू विक्री होतेय बारमाई..!

31 डिसेंबर रोजी खऱ्या अर्थाने होईल का अवैद्य दारू विक्रीवर कारवाई ..कारण दारू विक्री होतेय बारमाई..!                                     बारामती:-31 डिसेंबर ला अवैद्य दारू विकणाऱ्याची संख्या वाढणार असून त्यांची सद्या चांदी होणार आहे, सरत्या वर्षे व येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दारू पिणारे शौकीन मात्र तरर होताना दिसतील कारण दर वर्षी असा प्रकार लोक पाहतात व याही वर्षी दिसतील अशी चर्चा सद्या जोरात चालू आहे, मात्र पोलीस प्रशासनाने दारू बंदी साठी उपाय योजना काढल्या असून अनेक सामाजिक संघटना यांना आवाहन केले की चौका चौकात दूध वाटप करून लोकांच्यात जनजागृती करायची हा संकल्प बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मांडला तो कौतुकास्पद आहे त्याबद्दल पोलिसांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे पण या गोष्टी फक्त पोलिसांनी करायचे का? उत्पादन शुल्क विभाग लक्ष देईल का हा प्रश्न महत्वाचा आहे, प्रशासकीय भवन येथे भव्य ऑफिस असून काय उपयोग आहे अशी प्रतिक्रिया नागरिक करताना दिसते खुलेआम हॉटेल, ढाबा,घरगुती याठिकाणी अवैद्य दारू विकली जात असताना कारवाई होत नसल्याचे दिसून येत असल्याचे समजते त्याचबरोबर परमिट रूम, बियरबार,वाइन शॉपी याठिकाणी डूब्लिकेट दारू विक्री करीत असल्याचे समजते ,जर खरंच कारवाई करायचे असेल तर 31डिसेंबर रोजी अश्या दुकानाची व हॉटेल, ढाबा याची प्रामाणिक चौकशी केली तर सत्य बाहेर येईल असेही नागरिक बोलताना दिसते.

No comments:

Post a Comment