कनिष्क कांबळे अध्यक्षपदी तर डॉ. माकणीकर सह अन्य 4 विविध महामंडळावर नियुक्त. पक्षाची शिफारस - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

कनिष्क कांबळे अध्यक्षपदी तर डॉ. माकणीकर सह अन्य 4 विविध महामंडळावर नियुक्त. पक्षाची शिफारस

*कनिष्क कांबळे अध्यक्षपदी तर डॉ. माकणीकर सह अन्य 4 विविध महामंडळावर नियुक्त. पक्षाची शिफारस*

मुंबई दि (प्रतिनिधी) इंजि. कनिष्क कांबळे, डॉ. राजन माक्निकर व कॅ. श्रावण गायकवाड सह अन्य 3 जणांना विविध महामंडळावर नियुक्त करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाकडून शिफारस करण्यात आली आहे.

प्रमुख पदाधिकारी व निष्ठवंत कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक संपन्न झली त्यात हा निर्णय घेण्यात आला. पक्षाध्यक्षा नंदाताई कांबळे यांच्या आदेशाने या नावांची शिफारस राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडे करण्यात आली आहे. 

पक्षसंथापक, आमदार टी एक कांबळे यांच्या नंतर युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी पक्षाची धुरा उत्तमपणे सांभाळून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घटक पक्ष म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. आंबेडकरी समूहात एक वेगळे स्वच्छ आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व प्रस्थापित केले. समाज हितासाठी लढा उभारत असंख्य संकटांना चार हात करून खंबीरपणे पक्षनेतृत्व सांभाळले. त्यामुळे कनिष्क कांबळे यांना महामंडळावर घटक पक्ष या नात्याने अध्यक्ष पद द्यावे असा ठराव पास करण्यात आला.

तसेच राष्ट्रीय पदाची सूत्रे हातात घेऊन पक्षाला खऱ्या अर्थाने बळकटी देऊन भारतीय संविधान शालेय शिक्षणात सक्तीने शिकवले जावे यासाठी मागील 10 वर्षांपासून प्रयत्न करणारे, समाज व देश सेवेसाठी संबंध आयुष्य समर्पित समाजभूषण, पत्रकार, ग्रेट पँथर पारितोषिक विजेते डॉ. राजन माकणीकर.

अंगावरची कपडे ही कुणी मागितली तर काढून देणारे, कुणी आपल्या जवळ मागणी केली आणी ती पूर्ण होऊ नये, लग्न समारंभ अंत्यविधी, आदी सर्व ठिकाणी आवर्जून उपस्तिथी दर्शविणारे, रात्री अपरात्री कोणत्याही प्रसंगाला मदतीस धावून जाणारे व्यक्तिमत्व कॅप्टन श्रावण गायकवाड.

उल्हास नगर येथे टी. एम. कांबळे साहेबांच्या हयातीत विधानसभा लोकसभा व महापालिकेत उमेदवार उभे करून निवडून आणण्यासाठी कसोसिने प्रयत्न करून पक्षनिष्ठा जोपासणारे महाराष्ट्र राज्य उपनिरीक्षक श्रीधर गुडदे.

सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष तत्वे जोपासून टी एम कांबळे साहेबांचे सहकारी पक्ष व चळवळीसाठी स्वतःला झोकुन समाज हितावह कार्य करणारे पक्षाचे जेष्ठ निष्ठावंत व्यक्तिमत्व, राज्याचे  समन्वय समिती अध्यक्ष बळवंतराव पाटील.

या पक्ष पदाधिकारी व निष्ठवंतांचा शासनाच्या विविध महामंडळाच्या कार्यकरणीवर नियुक्ती करण्यात यावी यासाठी शिफारस करन्यात आली आहे.

No comments:

Post a Comment