वाळू तस्कर जोमात आणि महसूल विभाग कोमातच .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 11, 2020

वाळू तस्कर जोमात आणि महसूल विभाग कोमातच ..

वाळू तस्कर जोमात आणि महसूल विभाग कोमातच ..

 बारामती :- वाळू उपशामुळे बुडतो शासनाचा महसूल मेडद कऱ्हावागज नेपतवळण खंडोबानगर परिसरात सध्या नदी वड्यावर वाळू माफिया कडून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर करून वाळूची चोरी केली जात आहे. विशेष म्हणजे त्याकडे महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याने शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन धडक कारवाई करण्याची गरज असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. कऱ्हा नदी, ओढ्याच्या पात्रात सध्या काही वाळू माफिया अवैध वाळू उत्खनन करून वाळू चोरीचा सपाटा लावला आहे. याला काही राजकीय पुढारी तसेच शासकीय अधिकारी छुपे पाठबळ देेेत असलेचे       या परिसरातील नागरिकाकडून सांगण्यात येत आहे या भुरट्या वाळू  तस्कराची    हिंमतही दिवस दिवसे वाढत आहे हे वाळू चोर रात्रीच्या काळोखात वाळूचे उत्खनन करून आपापल्या सोयीने चोरीची वाळू रिकाम्या प्लॉटमध्ये किंवा शेतात साठवणूक करीत आहेत एवढेच नव्हे तर परिसरात कोणी नसल्याचे हेरून या साठवणूक केलेल्या वाळूचे चढ्या दराने नागरिकांना विक्री करीत आहेत त्यामुळे शासकीय संपत्तीची चोरी करून मोठी माया सध्या वाळू तस्कर कडून गोळा केली जात असल्याचे चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे.
   नदी ओढ्यातील वाळू हा शासनाच्या महसुलाचा प्रमुख स्तोत्रापैकी एक आहे परंतु बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील येथे होणाऱ्या वाळू उपशामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र दिसत आहे.पडद्यामागून काही संबंधित अधिकारी
वाळू माफिया च्या या मनमर्जी मुळे सध्या शासनाच्या मोठा महसूल बुडवत असताना कारवाईची जबाबदारी असलेल्या महसूल आणि पोलिस विभाग गप्प असल्याचे चित्र या परिसरात बघावयास मिळत आहे.एका ट्रिप साठी मोजले जातात पैसे - काही अधिकाऱ्यासह राजकीय पुढारी छुपे पाठबळ देत असल्याने या परिसरातील वाळू तस्कर सध्या ऍक्टिव्ह झाले आहेत त्यांच्याकडून एका ट्रिपसाठी छुपे पाठबळ देणाऱ्या या व्यक्तींना एक हजार रुपये दिले जात असल्याची चर्चा देखील या परिसरात रंगत आहे.आणखी सविस्तरपणे पुढील अंकी***

No comments:

Post a Comment