बिलोली घटनेतील सर्व दोषींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी--लहुजी शक्ती सेना बारामती तालुका महिला आघाडीची मागणी
बारामती : दिनांक 9 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील 27 वर्षीय अनाथ आणि मूकबधिर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेल्या बलात्कार, अत्याचार आणि अमानवीय निर्घुणपणे खून केल्याप्रकरणी दोषींवर शक्ती कायद्या नुसार योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी लहुजी शक्ती सेना महिला आघाडी बारामती तालुक्याच्या वतीने वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी बारामती तालुका युवती अध्यक्षा अनुजा लोंढे, मंगल खंडाळे, तनुजा आगलावे, अनुसया अहिवळे, नंदा लांडगे, सुशिला आगलावे सविता पाटोळे , विजय आगलावे, संदीप खंडाळे, शेखर पाटोळे, विकास शेंडगे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment