बारामतीचा विरोधी पक्षनेता सुनील सस्ते..अविरत सेवेची 'सोळा' वर्ष,,,तर चालू टर्मची चार वर्षे पूर्ण करणारा निर्भीड नगरसेवक - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

बारामतीचा विरोधी पक्षनेता सुनील सस्ते..अविरत सेवेची 'सोळा' वर्ष,,,तर चालू टर्मची चार वर्षे पूर्ण करणारा निर्भीड नगरसेवक

बारामतीचा विरोधी पक्षनेता सुनील सस्ते..अविरत सेवेची 'सोळा' वर्ष,,,तर चालू टर्मची चार वर्षे पूर्ण करणारा निर्भीड नगरसेवक.


बारामती:-सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आपली राजकीय, सामाजिक कारकीर्द सुरू करणारे , सलग चार पंचवार्षिक निवडणुकीत पराभवाचे तोंड कधीही न पाहिलेले बारामती नगरीतील सर्वमान्य नगरसेवक मा. सुनील सस्ते यांची आज चालु टर्मची चार वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

 अजात शत्रू ,निर्भिड व्यक्तिमत्व, हाती घेतलेले काम तडीस नेणारे नगरसेवक सुनील सस्ते हे प्रभाग क्रमांक 16 चे बारामती नगर परिषदेचे नगरसेवक आहेत.  उतणार नाही ,मातणार नाही, घेतला वसा, टाकणार नाही ही त्यांच्या प्रामाणिकपणाची खुणगाठ मनात ठेवून काम करणारे सुनील सस्ते सामान्य नागरिकाला काही अडचण आली, संकट आले तर अगदी रात्री अपरात्री हि आपला फोन चालू असतो केव्हाही फोन करा असं सांगणारी ही हस्ती मदतीला उभी असते. कोरोना च्या काळात लॉक डाऊन असताना  अनेक गरजू कुटुंबांना  जीवनावश्यक वस्तू  घरपोच देणे, रेमीडेसिवर इंजेक्शन  मिळविण्यासाठी मदत करणे,अगदी  पेशंटला दवाखान्यात दाखल करण्यापर्यंत  सर्व गोष्टींची मदत  प्रांताधिकारी  दादासाहेब कांबळे  यांच्या मार्गदर्शनाने,  एन एक्स पी डिजिटल च्या  मदतीने  पोचवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. सामान्य नागरिकाचे छोटे-छोटे प्रश्न असो की नगरपालिकेतील इतर धोरण त्यामुळे लोकांची अडवणूक होईल, नुकसान होईल त्या विरोधात सतत आवाज उठवणे असो यामध्ये शहरातील इंदापूर रोडवरील बाह्य मार्ग देवकाते हॉस्पिटल ते शारदा नगर सेवा रस्त्यामुळे अनेक व्यवसायिकांची दुकाने ,घरे बाधित होणार होती दोन्ही बाजूला साडेसात मीटर चा नवीन रस्ता होणार होता. त्यामुळे नुकसानीचा अंदाज घेऊन हा रस्ता रद्द करण्यासाठी उपोषणा पर्यंत सर्व सोपस्कार पार पाडून हा रस्ता रद्द केला.

 बारामतीतील नागरिकांची दुहेरी टोलच्या माध्यमातून होणारे आर्थिक लूट हाही विषय त्यांनी हाताळला. नगरपालिकेच्या नवीन हद्द वाडी मध्ये येणारी गावे, प्रभाग यांना नगरपालिकेच्या वतीने लाईटची किंवा ड्रेनेजची सोय केली नसताना नगरपालिका या ठिकाणच्या रहिवाशांकडून कराचे रूपाने आकारणी करत होती ती रक्कम जवळपास सात कोटीच्या आसपास होती. मात्र जी सेवा नगरपालिका देत नाही लाईट, गटर लाईन न देता त्या सेवेच्या रूपाने नगरपालिका कर घेत होती. तो कर घेऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली व त्या ठिकाणी जनतेचा अंदाजे तीन कोटी रुपये कर नगरपालिकेला कमी करावा लागला होता .

नगरपालिकेचा कारभार थेट लोकांना माहिती व्हावा याकरिता नगरपालिकेच्या प्रत्येक मीटिंगमध्ये जनतेच्या वतीने प्रभावी बाजू मांडणे, सामान्य जनतेला नगरपालिकेच्या कामकाजाची माहिती व्हावी म्हणून ते सदैव तत्पर असतात.

मला ज्यांनी निवडून दिले त्यांची कामे करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.आपण जनतेचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी सतत जनतेच्या प्रश्नांना महत्त्व देतो. यापुढेही माझे काम सेवक म्हणून अधिक जोमाने करून लोकांच्या सुखदुःखात सहभागी राहुन, त्यांच्या ऋणात राहणे हेच माझे कर्तव्य मी समजतो...
मा.सुनील सस्ते नगरसेवक ,बारामती नगर परिषद

No comments:

Post a Comment