ठाणे(प्रतिनिधी):-भाजप केंद्र सरकारने शेतकर्यांच्या विरोधात केलेला काळा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी महामहीम मा.श्री.रामनाथ कोविंद , राष्ट्रपती भारत सरकार,राष्ट्रपती भवन,नवी दिल्ली
यांना भाजपच्या केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे संमत केले आहे.त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरात मुख्यता दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे.या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष महसूल मंत्री मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व मा.विजयजी अंभोरे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या सुचनेप्रमाणे आम्ही पाठींबा देत असून हा शेतकरी विरोधी काळा कायदा आपण रद्द करावा व आपल्या भारत देशातील जगाचा पोशिंदा कष्टकरी शेतकरी बळीराजाला न्याय द्यावा असे निवेदन ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी मा.श्री.शिवाजी पाटील यांच्या कडे मा. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी
श्री.नंदकुमार मोरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी सौ.शिल्पा सोनोने अध्यक्षा-ठाणे शहर (जि) महिला काँग्रेस, श्री.संकटा पाठक सरचिटणीस ठाणे शहर(जि) काँग्रेस,सौ.वसुधा गायकवाड सचिव ठाणे शहर(जि) महिला काँग्रेस,श्री.मनोजकुमार पांडे सचिव ठाणे शहर काँग्रेस,विनित मोरे सरचिटणीस ठाणे शहर (जि) युवक काँग्रेस,श्री.सुनिल भाबळ हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment