बारामतीत लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 2, 2020

बारामतीत लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार ..

बारामतीत लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार ..                                      बारामती:-बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अरविंद कौशल्य पटेल (सध्या रा.घाडगेवस्ती. बयाजीनगर, बारामती, मूळ रा.कुरलीखांड,परप्रांतियाविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात जि. सिद्धी, मध्य प्रदेश) या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बारामती तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित युवती मूळची दौंड येथील आहे. ती बारामती एमआयडीसी भागात मामे बहिणीकडे राहत होती. या दोघी येथील एका कंपनीत
काम करत होत्या. त्यांच्या शेजारीच पटेल हा आई-वडील भावासह राहत होता.
दरम्यान, त्याने तरुणीवर प्रेमाचे जाळे फेकत तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. नंतर तिच्याशी बोलणे सुरु केले. तिला आपल्या प्रेमात ओढल्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये तू मामे बहिणीला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लवकरच लग्न करू, आश्वासन तिला दिले. त्यावर विश्वास ठेवून ती एमआयडीसीतील रुई भागात त्याच्यासोबत एका खोलीत राहू लागली. त्यादरम्यान त्याने तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले.असे तिने लग्नाची विचारणा केल्यावर सध्या पैसे नाहीत,पैसे आले की लग्न करू असे तो सांगत होता. वारंवार विचारणा केल्यावर त्याने दारु पिवून येत तिला वेळोवेळी मारहाण करीत होता तसेच जीवे मारण्याची धमकी देत असे. त्यानंतर (दि. ११ नोव्हेंबर
रोजी) तो कंपनीत कामाला जातो, असे सांगून घरातून गेला. तो परतला नाही. त्यामुळे युवतीने तो हरवल्याची फिर्याद तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली होती.परंतु त्याने लग्नाचे अमिष दाखवून शारिरिक संबंधासाठी वापर केल्याचे लक्षात आल्यानंतर तिने त्याच्या विरोधात अत्याचाराचीही तक्रार दाखल केली असून भा द स ३७६,३२३,५०४,५०६नुसार दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे करत आहेत.

No comments:

Post a Comment