*बारामतीत मांडूळ तस्करी प्रकरणी दोन इसम ताब्यात*
बारामती:- दिनांक 14. 12.2020 दुपारी 2 वाजताच्या सुमारास नक्षत्र गार्डन,बारामती येथे दोन अनोळखी इसम मोटार सायकल वर संशयित रित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. सदरची माहिती प्राप्त होताच येथे जाऊन नमूद संशयित इसम नामे1)गणेश लक्ष्मण गायकवाड वय 25 वर्षे राहणार.पाटण सांगवी,ता.आष्टी, जि.बीड.
2) राजेंद्र उत्तम चांगण, वय 53 वर्षे रा साखरवाडी, ता.फलटण, जि.सातारा यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्या कडील कापडी पिसवी मध्ये एक मांडूळ मिळाले. सदर मांडूळ बाबत चौकशी केली असता त्यांनी मांडूळ विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.कासव जवळ बाळगणे , त्याची विक्री करणे हा भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा असून मांडूळ पासून पैशाचा पाऊस पडतो या अंधश्रद्धेमुळे मांडूळची लाखो रुपयांना तस्करी होते. सदर दोन्ही इसमांना तसेच त्यांच्या ताब्यातील मांडूळ व मोटार सायकल पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार जयंत ताकवणे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अबरार शेख यांनी केली
No comments:
Post a Comment