बारामती मधील जळोची गावात बस स्टँडची व चौकात सिसिटीव्ही बसविण्याची मागणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

बारामती मधील जळोची गावात बस स्टँडची व चौकात सिसिटीव्ही बसविण्याची मागणी...

बारामती मधील जळोची गावात बस स्टँडची व चौकात सिसिटीव्ही बसविण्याची मागणी...         बारामती:-येथील जळोची गाव हे प्रसिद्ध असल्याने या गावातून एम आय डी सी ,विद्या प्रतिष्ठान,बारामती शहर,कृषि उत्पन्न बाजार समिती, जनावरांचा बाजार, कण्हेरी, इंदापूर कडे जाणारे मुख्य रस्ते जोडले गेले अनेक नागरिक या गावातुन ये जा करीत असतात तर गावातील लोकांना शहरात अथवा कामानिमित्त एम आय डी सी मध्ये ,लहान मुलांना शाळेत सोडविण्यासाठी व मार्केट यार्ड असल्याने याठिकाणी सतत वाहतूक चालू असते अनेकदा या रस्त्यावर अपघात झाले आहे, अनेकांचा तात्काळ उपचारावाचून बळी गेले आहे तर काही जण जखमी झाल्याचे पाहिले आहे त्यामुळे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती चे बारामती तालुका अध्यक्ष अस्लम वस्ताद शेख यांनी जळोची गावातील चौकात सि सि टी व्ही कॅमेरा बसविण्यासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले, याच रस्त्यावरून अनेक वेळा अवैध वाहतूक केली जाते, गुन्हेगार याच रस्त्याने पळून जातात अश्या वेळी कॅमेरा असेल तर गुन्हेगार सापडण्यास पोलीस यंत्रणेस मदत होईल त्याच बरोबर स्थानिक रहिवाशी यांना शहरात येण्याजाण्यासाठी बस स्टँड थांबा या ठिकाणी होण्यासाठी देखील मागणी करणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment