बारामती येथे मनुस्मृती चे दहन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

बारामती येथे मनुस्मृती चे दहन

*बारामती येथे मनुस्मृती चे दहन*

बारामती:-ज्या मनुस्मृती नुसार कुळवाडी भूषण बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवरायांचा मनुवाद्यांनी राज्याभिषेक नाकारून अपमान केला.त्याचाच बदला म्हणून २५ डिसेंबर १९२७ ला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती चे दहन करून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या राजाच्या अपमानाचा बदला घेतला.त्याच ऐतिहासिक घटनेला आज ९३ वर्षे पूर्ण होतायत. त्याच ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून आज बारामतीत माजी उपनगराध्यक्ष भारत(दादा) अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शेरसुहास मित्र मंडळाचे शुभम अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सेजल अहिवळे,काजल अहिवळे,सारिका गव्हाळे,सौरवी अहिवळे,प्रेरणा अहिवळे,राजश्री अहिवळे या तरुणींच्या हस्ते मनुस्मृती चे दहन करण्यात आले.

दरम्यान या वेळी बा.न.प चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे,राजेश पडकर,प्रशांत लांडे,विशाल घोडके,मुकेश अहिवळे,रितेश गायकवाड,राहुल सोनवणे,प्रफुल्ल राठोड,पप्पू माने,सुनिल चव्हाण,रोहित वाघमोडे,सागर गायकवाड,अक्षय शिंदे,रणजित मोरे,हनुमंत शिंदे यांच्यासह आदी अनुयायी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment