कोरोना काळातील सरसकट विजबिल माफ करावे
बारामती : कोरोना राष्ट्रीय आपत्तीत देशातील सर्वोत्परी घटक याचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते यामध्ये प्रामुख्याने लघुउद्योजक छोटे मोठे व्यावसायिक यांचे व्यावसाय डबघाईला आले तर असंख्य लोकं हि रोजगारा पासून वंचित झाले
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे ञिशंकु सरकार असून जनहितासाठी ते निर्णायक काम करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे कोरोना राष्ट्रीय आपत्तीत लोकांचे जगणे जिकरीचे झाले आहे सरकारने मध्यम मार्ग म्हणून गेल्या काही महिण्यांपुर्वी पन्नास टक्के विजबिल माफी बाबत अहवाल तयार केला होता परंतु राजकीय महाविकास आघाडीत तारतम्य नसल्यामुळे सदर सरसकट विजबिल माफी चा प्रस्ताव पुढे रेंगाळला .
बारामती तालुका शहर व ग्रामीण भागातील रिपब्लिकन युवा मोर्चा व बारामती मधील बहुजन संघटनांचे प्रतिनिधी यांचे संयुक्तपणे तसेच बारामती मधील ञस्त विजबिल धारक महिला पुरुषांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत महावितण महामंडळ बारामती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बारामतीतील सर्वसामान्यांची सरसकट विजबिले पुर्णपणे माफ करणे कामी जनआक्रोश मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बारामती मधील रिपब्लिकन युवा मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मा श्री अजय लोंढे , पुर्व विभाग पुणे अध्यक्ष मा श्री अनिल मोरे , बारामती तालुका उपाध्यक्ष आनंद काकडे , सामाजिक कार्यकर्ते संदिप बनसोडे , शेरसुहास मिञ मंडळ व मानव एकता युवक संघटना प्रमुख मा श्री भारत दादा अहिवळे , शुभम अहिवळे , मार्केट कमिटीचे मा श्री विलास पोमणे , काँग्रेस शहर युवक अध्यक्ष मा श्री योगेश महाडीक , आनंद माने , तसेच बारामती मधील बहुसंख्य विजबिल ञस्त महिला पुरुष धारक उपस्थित होते यावेळी शासन प्रशासन विरोधात तीव्र घोषणा बाजी करीत महामानवांच्या घोषणांची घोषणा बाजी करीत विद्युत विजबिल सरसकट माफ करा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ महावितण चे अधिकारी अभियंते मा श्री प्रकाश देवकाते व मा श्री धनंजय गावडे यांनी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलनाच्या मागण्या समजून घेऊन सर्व मागण्या शासन दरबारी पोहचवू लेखी आश्वासन दिले तसेच कोरोना काळात आलेल्या विजबिलांची फेरतपासणी आढाव चुकून लादलेली ज्यादा बिले यांचे सर्व्हेक्षण योग्य तपासणी मोहिम राबवून जनतेसाठी हितार्थ निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती श्री अजय लोंढे , पश्चिम महाराष्ट्र प्रभारी रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिली.
No comments:
Post a Comment