बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडून बारामती शहर हददीत जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद, ३ लाख किंमतीचे सोन्याचे दागीनेहस्तगत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडून बारामती शहर हददीत जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद, ३ लाख किंमतीचे सोन्याचे दागीनेहस्तगत..

बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडून बारामती शहर हददीत जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद, ३ लाख किंमतीचे सोन्याचे दागीने
हस्तगत..
बारामती:-पुणे ग्रामीण जिल्ह्यात महीलांचे गळयातील सोन्याचे गंठण हिसकावुन चोरी करण्याचे गुन्हे होत असल्याने त्या अनुषंघाने मा.पोलीस अधिक्षक सो.पुणे ग्रामीण यांचे सुचने प्रमाणे जिल्हयात सर्व पोलीस स्टेशनला गुन्हे उघडकीस करण्याचे दुष्टीने सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशन हददीत नाकाबंदी नेमण्यात आली होती.नाकाबंदी दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं ४९८/२०२० भा.द.वी कलम ३९२,३४ या गुन्हयात अटक असलेला आरोपी अक्षय विलास खोमणे वय २४ वर्षे रा,कोऱ्हाळे बु।। ता.
बारामती जि.पुणे यानी बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली आहे.त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस स्टेशन गू.र.नं ३९६/२०२० भा.द वि.कलम ३९२,३४ प्रमाणे
दाखल गुन्हयात वर्ग करून घेवुन त्याचेकडे अधिक विचारपुस करता त्याने सांगीतले की मी,माझा साथीदार चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे वय ३२ वर्षे सध्या रा. निरा ता पुरंदर जि.पुणे व राहुल पांडुरंग तांबे वय २८ वर्ष रा.जेऊर ता पुरंदर जि.पुणे असे आम्ही तीघांनी मिळुन बारामती शहरात एकुण तीन वेगवेगळया ठिकाणी महीलांचा पाठलाग करून त्यांचेकडे पत्ता विचारनेचा बहाना करून त्याचे गळयातील सोन्याचे गंठण जबरीने हिसकावुन चोरी करून चोरून नेले असुन पोलीस कस्टडीतील आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे याचेकडुन तीन वेगवेगळया गुन्हयातील एकुण ३,००,०००/-रूपये किंमतीचे तीन वेगवेगळी सोन्याचे गंठणे एकुन सहा तोळे वजनाचे आरोपी कडून हस्तगत करून बारामती शहर पोलीस ठाण्यातील १) ३८४/२०२० भा.द.वि.कलम ३९२,३४ २) ३९६/२०२० भा.द.वि.कलम ३९२,३४ ३) ५६६/२०२०/२०२० भा.दवि.कलम ३९२,३४ असे जबरी चोरीचे तीन गु्हे उघडकीस आले आहे.सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे करीत असुन अटक आरोपी याने पुणे जिल्हात वेगवेगळया पोलीस ठाणेत दरोडयाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख साो.व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते सो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर सो,पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा .पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे,सचिन शिंदे,सहा.पो.उपनिरीक्षक संजय जगदाळे पोलीस नाईक रूपेश साळुखे,पो.का.सुहास लाटणे,दशरथ इंगवले,बंडु कोठे,योगेश कुलकर्णी,अजित राऊत,तुषार चव्हाण, अकबर शेख, अशोक शिंदे यांनी केली.

No comments:

Post a Comment