ग्रामीण भागात बस फेऱ्यांचा अभाव ,मुले शाळेत कशी जाणार पालकांपुढे प्रश्न - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 11, 2020

ग्रामीण भागात बस फेऱ्यांचा अभाव ,मुले शाळेत कशी जाणार पालकांपुढे प्रश्न

ग्रामीण भागात बस फेऱ्यांचा अभाव ,मुले शाळेत कशी जाणार पालकांपुढे प्रश्न
 मेडद(माधव झगडे):- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले आठ महिने शाळा व महाविद्यालय बंद होते. परंतु आता दीर्घकाळानंतर शासनाने येत्या  नोव्हेंबर मध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील ग्रामीण भागातून तालुक्याच्या  ठिकाणच्या शाळेमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. व ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही बसफेऱ्या बंद असल्याने हे विद्यार्थी शाळेपर्यंत जाणार कशाने हा मोठा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे उभा राहिला आहे.विद्यार्थी एसटीने प्रवास करताना सामाजिक अंतर पाळतील का हा एक मोठा प्रश्न आहे. आमच्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार व विद्यार्थ्यांच्या प्रवासाची योग्य सोय उपलब्ध करून द्यावी. अशी देखील मागणी ग्रामीण भागातील पालक वर्ग करीत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने एसटी बस मध्ये मोठी गर्दी होईल. व सोशल डिस्टिग पाळले जाईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्‍न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलेले आहेत. व एसटी बस नसेल तर आमचे विद्यार्थी शाळेत जाऊ शकणार नाहीत.शाळा सुरू होणार असल्याने आम्हाला देखील खूप आनंद होत आहे. परंतु आमच्या मुलांची प्रवासाचे चिंता मात्र आम्हाला लागली आहे. स्थानिक विद्यार्थ्यांचे ठीक आहे. पण ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची समस्या मात्र मार्गी लागणे गरजेचे आहे. व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे जबाबदारी देखील घेणे महत्वाचे आहे.

No comments:

Post a Comment