लहान मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवत लैगिक अत्याचार.
फलटण (प्रतिनिधी) :लहान मुलाला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण शहरातील दोन अल्पवयीन मुलांवर बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा नोंद झाला. या दोघांनाही सातारा येथे बाल सुधारगृहात पाठविण्यात आले
आहे.फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील 16 व 17 वर्षे वयोगटातील मुलांनी शेजारी राहात असलेल्या आठ व नऊ वर्षांच्या मुलांना मोबाईलवर गेम दाखविण्याचे आमिष दाखवित त्यांच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. नऊ सप्टेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत
घरालगत असलेल्या शौचालयाच्या पायरीवर व घरी कुणी नसताना हा प्रकार घडला आहे. या मुलांनी या प्रकाराची कल्पना घरी दिल्यानंतर कुटुंबीयांनी फलटण शहर पोलिस
ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची सातारा येथील बाल सुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारी तपास करीत आहेत.दरम्यान, लहान मुलांकडून मोबाईलचा चुकीचा वापर झाला,की अशा प्रकारची गैरकृत्ये घडतात. त्यामुळे मुलांकडे जास्त वेळ मोबाईल देणे धोकादायक आहे. मुलांकडे मोबाईल असताना ते मोबाईलवर काय पाहतात याकडे पालकांनी लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मुले मोबाईल वापरताना
पालकांनी सजग राहावे, असे आवाहन फलटण पोलिसठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी केले आहे.अश्या घटना आजूबाजूला घडू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment