सोमेश्वरला शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसनिमित्त सामाजिक उपक्रम घेत साजरा...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी:-पदवी भूषण देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार व प्रतिभा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणेच सकाळी सोमेश्वर मंदिरात मान्यवरांच्या हस्ते शरदचंद्रजी पवार यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी सोमेश्वर शिवलींग करंजे येथे महारुद्र अभिषेक करण्यात आला , तसेच सोमेश्वरनगर व तालुक्यातील पर राष्ट्रवादी मान्यवरांच्या हस्ते मंदिर परिसरात एकत्रित केक कापण्याचा ही कार्यक्रम संपन्न झाला..
प्रणाली एज्युकेशन सोसायटी करंजे यांच्या माध्यमातून मान्यवर यांच्या हस्ते गरजूंना कपडे वाटप व एक झाड संगोपनासाठी देण्यात आले.
बारामती तालुक्यातील चौधरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी करंजे व ग्रामस्थ , सोमेश्वर सेवाभावी संस्था तसेच प्रणाली एज्युकेशन सोसायटी यांच्या अंतर्गत चौधरवाडी ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी रक्तदान शिबिरात घेण्यात आले तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता करंजेपुल , करंजे , देऊळवाडी , मुर्टी या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदानात सहभागही नोंदवला होता या शिबिरात ८५ बाटल्यांचे संकलन झाले,
शरदचंद्र पवार यांच्या वर असणारे प्रेम व वाढदिवसाच्या शुभेच्छा रक्तदान तून व्यक्त केल्याबद्दल रक्तदानशूरांचे ग्रामस्थांनी आभार मानत धन्यवादही दिले..
प्रणाली एज्युकेशन सोसायटी करंजे यांच्या माध्यमातून मान्यवर यांच्या हस्ते गरजूंना कपडे वाटप व एक झाड संगोपनासाठी देण्यात आले.
प्रणाली एज्युकेशन सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे यांनी प्रणाली एज्युकेशन सोसायटीची माहिती देत परिसरात गरजू विद्यार्थ्यांनीही याचा लाभ घ्यावा व या शिक्षण संस्थेत असणाऱ्या विविध योजना याचीही माहिती दिली हे शैक्षणिक संकुलन सर्वांच्या आशीर्वादाने सुरू करत आहहोत तसेच तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही या शिक्षण सोसायटीचे कौतुक करत लागणारे सहकार्य आम्ही निश्चित करू तसेच उपस्थित मान्यवरांनीही कौतुकाची थाप देत आपले कार्य इथून पुढे चांगले घडो अशी अपेक्षा व शुभेच्छा दिल्या,
सूत्रसंचालन स्वप्नील काकडे व आभार संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे यांनी केले विशेष सहकार्य सोसायटी चे सदस्य विनोद गोलांडे , सुखदेव शिंदे भाऊसाहेब हुंबरे,अमोल फरांदे,
याप्रसंगी बारामतीतालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर , सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , पुणे जिल्हा विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व सोमेश्वर चे मा अध्यक्ष राजवर्धन शिंदे , उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक विशाल गायकवाड, युवा नेते गौतम काकडे , विक्रम भोसले, कौस्तुभ चव्हाण , खजिनदार संतोष हुंबरे तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील चौधरवाडी , करंजे, करंजेपुल , सोरटेवाडी येथील आजी-माजी सरपंच, उपसरपंच ,संचालक , सदस्य मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment