मोटार सायकल चोरी करणारी मामा भांजे जोडी केली गजाआड,६ मोटार सायकल केल्या हस्तगत .........
बारामती:-मागील काही दिवसांपासून बारामती एमआयडीसी,शहर परिसरातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते,त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहीत काढून संशयित मामा भाचे संदीप बाळू माने वय 35 वर्ष,राहणार.खंडोबा नगर,बारामती व स्वप्नील काळूराम भोसले वय 27 वर्षे ,राहणार. निरवागज, ता. बारामती यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून बारामती तालुका पोलिस स्टेशन व बारामती शहर पोलिस स्टेशन हद्दीतून मागील दोन वर्षापासून चोरी केलेल्या ६ मोटर सायकली( २ स्टार सिटी,१ पॅशन,२स्पेंडर,१ सुझुकी एकूण किंमत १,८०,००० रुपये)हस्तगत करण्यात आलेल्या आलेल्या असून त्या दोघांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.यातील आरोपी संदीप माने हा मोटार सायकल चोरी करणारा सराईत असून यापूर्वी त्याच्यावर हडपसर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक देशमुख सो.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.मोहिते सो, अधिकारी श्री.शिरगावकर सो , पो नि महेश ढवाण यांच्या मार्गदर्शन खाली सपोनी योगेश लंगुटे, पोलीस कॉनस्टेबल नंदू जाधव , मंगेश कांबळे, विनोद लोखंडे,विजय वाघमोडे, राहुल पांढरे, रणजीत मुळीक यांनी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी दिली.
No comments:
Post a Comment