महापरिनिर्वाण दिनानिमित्त बारामतीत रक्तदान शिबीर संपन्न
बारामती ( वार्ताहर ) येथील शेरसुहास मित्र मंडळ यांच्या वतीने, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील शेरसुहास मित्र मंडळाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवार दि.८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या शुभहस्ते ब्लड बँकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. धवडे, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले.
या रक्तदान शिबिरा मध्ये तब्बल 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी शेरसुहास मित्र मंडळाचे सुशिल अहिवळे, शुभम अहिवळे,विशाल घोडके, मुकेश अहिवळे,नितीन गव्हाळे,संजय शिंदे,सतिश अहिवळे,सुनिल चव्हाण,सचिन जगताप,किरण अहिवळे,सागर अहिवळे,अक्षय अहिवळे,सोमनाथ कदम,अनिकेत थोरात व आदींनी परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment