विद्यार्थी वाहतूक संघटनेचे लाक्षणिक उपोषण... बारामती:-कोविड महामारी सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील विद्यार्थी वाहतुकदारांच्या प्रश्नांकडे
दुर्लक्ष केल्याने दि. 14/12/2020 रोजी "लाक्षणिक उपोषण" बारामती येथील प्रशासकीय भवन इमारती समोर करण्यात आले,
मार्च 20 पासून कोविडच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी वाहतूकदार यांचा व्यवसाय देशोधडीला मिळाला असून कर्जबाजारी होऊन अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली
आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ व स्थानिक संघटनांनी वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिले आहे. पत्रव्यवहारातील एकाही मागणीचा शासनाने विचार केला नाही किंवा कोणत्याही प्रकारची दखल घेऊन संघटनांबरोबर चर्चा केली नाही याची खंत वाटते तंरी आमच्यावर होणाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व आमच्या प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी यासाठी आज दिनांक 14 डिसेंम्बर 2020 या दिवशी तहसील कार्यालय येथे ठीक सकाळी 11 ते
सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवस "लाक्षणिक उपोषण" करण्यात आले आहे आमच्या खालील मागण्या शासनाने मान्य कराव्यात आन्यथा या पुढे आम्हाला बेमुदत अन्न त्याग करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी परिणामांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. आम्ही आतापर्यंत आंदोलन शांततेच्या मार्गाने केले आहे याची शासनाने दखल घ्यावी हीच विनंती.(१) विद्यार्थी वाहतूक दारांसाठी कल्याणकारी मंडळ किंवा बोर्ड स्थापन करण्यात यावा(२) स्कूल बस बंद असल्यामुळे परिवहन विभागाचा टॅक्स पार्सींग फी व्यवसायकर 100 टक्के माफ करण्यात यावा(३) स्कूल बस साठी बँक व फायनान्सच्या कर्जाची मुदत वाढवून भेटावी व त्यावरील दंड व्याज व व्याज माफ करण्यात यावे(४) गेले
दहा महिने स्कुल वाहतूक व्यवसाय बंद असल्यामुळे वाहतूकदार चालक-मालक व अटेडंट यांना आर्थिक मदत मिळावी(५) कोरोना कालावधीमध्ये ज्या गाड्यांचे इन्शुरन्स काढले आहेत त्यांना पुढे हा कालावधी तेवढेच माहिने मुदत वाढवून मिळावी(६) शाळा चालू झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक परिवहन कार्यालयांमध्ये स्कूल बस साठी शंभर रुपये टॅक्स घेऊन समतोल ठेवावा स्कुल बस
रजिस्ट्रेशनसाठी शाळेने समंतीपत्र देवून सहकार्य करावे. या आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा या मागणीचे निवेदन संस्थापक तानाजीराव बांदल,अध्यक्ष नानासो तुकाराम गावडे, उपाध्यक्ष श्री.रणजीत श्रीहरी भापकर सरचिटणीस व नियोजन समिती,श्री.अशोक नारायण मोरे कार्याध्यक्ष,परिवहन व नियोजन समिती,श्री.गजानन कृष्णा गावडे (लंगोटे) परिवहन व नियोजन समिती,श्री.दत्तात्रय महादेव शेटे खजिनदार व समन्वय समिती,श्री.अनिल त्रिंबक जमदाडे सचिव व समन्वय समिती,श्री.अमोल ज्ञानदेव हिवरकर सहकार्याध्यक्ष श्री.इरशाद नैनुद्दीन सय्यद
सहसचिव श्री.गणेश शिलेदार कणसे,सहखजिनदार श्री.सोमनाथ नारायण काळे,सदस्य श्री.पांडूरंग सोनबा राऊत, सदस्य श्री.पांडूरंग शंकर कणीचे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment