शेतकऱ्यांच्या समर्थानात भारत बंद ला रिपाई डेमॉक्रेटिक जाहीर पाठिंबा
मुंबई दि (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या जाचक कायद्यामुळे शेतकरी वर्गावर अन्याय होत असून शेतकर्यांनी पुकारलेल्या बंदला आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे डॉ राजन माकणीकर यांनी सांगितले आहे.
पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक हा पक्ष तळागाळातील सर्वांचा पक्ष असून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासनाशी झगडुन जाचक कायदा रद्द करविण्यास भाग पाडेल अस आशावाद ही माकणीकर यांनी व्यक्त केला.
8 दिसेम्बर रोजी शेतकऱ्यांच्या भारत बंद च्या हाकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थन असून शेतकर्यांच्या न्यायिक हककासाठी छातीवर गोळी पण झेलु असे मत अध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास भारत बंद मध्ये रिपाई डेमोक्रॅटिक चे कार्यकर्ते आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवतील अशी माहिती डॉ माकणीकर यांनी दिली
No comments:
Post a Comment