बारामती मार्केट कमिटी मध्ये शासकीय तुर खरेदी केंद्रासाठी नाव नोंदणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

बारामती मार्केट कमिटी मध्ये शासकीय तुर खरेदी केंद्रासाठी नाव नोंदणी

बारामती:-बारामती मार्केट कमिटी मध्ये शासकीय तुर खरेदी केंद्रासाठी नाव नोंदणी सुरू हंगाम २०२०-२०२१ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेला किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेड मार्फत रू. ६०००/- प्रति क्विटल हमीभावाने तुर खरेदीसाठी दि. २८/१२/२०२०
पासुन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सध्या तुर हंगाम सुरू झाला आहे. बाजार आवारात तुरीचे दर हमीभावा पेक्षा कमी निघत आहेत. त्यामुळे बारामती तालुक्यातील तुर उत्पादक
शेतक-यांनी आपली नोंदणी करून सदर तुर खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा असे आव्हान बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे व उपभापती बाळासो पोमणे
यांनी केले आहे.शेतकरी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावयाची असुन नोंदणी करण्यासाठी शेतक-यांचे आधारकार्ड, सन २०२०-२०२१ मधील ऑनलाईन ७/१२ उतारा पिक पे-यासह आणि IFSC कोड सह बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत. शासनाने दिलेल्या कालावधी मध्ये निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक बारामती येथे शेतकरी नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे शेतक-यांनी वेळेत नोंदणी करावी तसेच शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर
आणताना स्वच्छ व वाळवुन आणावा अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

No comments:

Post a Comment