डिजिटल मटक्याच्या मोहात अडकली तरुणाई ,
पोलिसांचा कानाडोळा..
मेडद(माधव झगडे):- कोरोनामुळे बेरोजगार झालेली ग्रामीण व शहरी भागातील तरुण मुले डिजिटल मटक्याच्या मोहात अडकल्याचे चित्र ग्रामीण व शहरी भागात दिसू लागले आहे. ओपन क्लोज किंवा आकडा लावण्यासाठी बुकिंग वाल्या पर्यंत जाण्याचा आता गरज लागत नाही. व्हाट्सअपवर आकडा सांगितला की लगेच तो नोंद करून त्याचा फोटो बुक वाल्याकडून काही वेळेतच पाठवला जातो. कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ही तरूण मुले 20 ते25 वयोगटातील आहेत. ही मुले ग्राहकाकडून व्हाट्सअपवर ओपन क्लोज, आकडा च्या जोड्या, संगम, पाने व किती रुपयाचा मटका लावायचा ही माहिती घेतात. कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ही तरुणाई या डिजिटल मटक्याच्या मोहित आडकली जात असल्याचे चित्र ग्रामीण व शहरी भागात दिसू लागले आहे.मटका व्यवसायाकडे पोलीस प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे राजरोसपने सुरू असलेल्या मटक्याच्या व्यवहारात रोज साधारणपणे लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या ह्या व्यवसायची व्याप्ती दिवसे दिवस वाढत चालले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मटक्याच्या आहारी चाललेले तरुणाई व त्यामुळे घराघरांमध्ये वाढता कहर, उध्वस्त होत चाललेले संसार, दारू,: गांजा यादी व्यसनात वाढत चाललेल्यात ही तरुणाई बुडालेले आहे. कमी वेळेत जास्त पैसे मिळत असल्यामुळे तरुणाई मटक्याच्या आहारी चालली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. हे रोखण्यासाठी पोलिसांनी या व्यवसायाला प्रतिबंध घालावा अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.मटक्याच्या आहारी गेलेल्या सर्वसामान्य व विशेष म्हणजे तरुण वर्ग असून कर्जबाजारीपणामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले दिसत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने मटका चालकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामीण व शहरी भागातून होत आहे. तर अवैद्य धंदविरोधात कारवाई बाबत पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याने जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा हा खरा प्रश्न आहे. असे नागरिकाकडून बोलले जात आहे.
**कष्ट न करता झटपत श्रीमंत**
मटका बुकी व मालक मालामाल तर सर्वसामान्य तरुण मटक्याच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाले आहेत. कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण मुले मटका व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याचे चित्र ग्रामीण व शहरी भागात दिसत आहे.
No comments:
Post a Comment