बारामती तालुक्यात दिराच्या मदतीने पतीचा खून करून टाकले विहिरीत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 2, 2020

बारामती तालुक्यात दिराच्या मदतीने पतीचा खून करून टाकले विहिरीत...

बारामती तालुक्यात दिराच्या मदतीने पतीचा खून करून टाकले विहिरीत...                     बारामती:-बारामती व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून काहींना काही घटना घडत असतानाच धक्कादायक घटना समोर आली , दिरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला पतीचा अडथळा असल्याने पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत 25 किलोचा दगड बांधून टाकला. बारामती तालुक्यातील सुपेजवळच्या कुतवळवाडी येथील ही  घटना घडली आहे.कुतवळवाडी येथील रामदास विठ्ठल महानवर हा 25 नोव्हेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ गणेश याने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली होती तीन दिवसानंतर रामदास यांचा मृतदेह कुतवळवाडी नजीक एका विहिरीत तरंगत
असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली
त्यावरून हा मृतदेह काढला असता मृतदेहाला 25 किलोचा दगड बांधलेला पोलिसांना दिसला. तसेच रामदास यास विहिरीत टाकण्यापूर्वी त्याला मारलेले असल्याचे दिसून आले. यासंदर्भात वडगाव निंबाळकरचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी रामदास यांची पत्नी
ताई आणि फिर्यादी गणेश याच्याकडे चौकशी केली असता, दोघांकडून वेगवेगळी माहिती मिळत असल्याचे दिसून आले. तसेच स्थानिक ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यादृष्टीने तपास केला असता दोघांनी मिळून रामदास यांचा खून केला हे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली व दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment