पिंपरी चिंचवड चे उपमहापौर केशव घोळवे यांचा बारामतीत नागरी सत्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

पिंपरी चिंचवड चे उपमहापौर केशव घोळवे यांचा बारामतीत नागरी सत्कार..

पिंपरी चिंचवड चे उपमहापौर केशव घोळवे यांचा बारामतीत नागरी सत्कार..                                                                                    बारामती:-दि.13/12/2020 रोजी बारामती भारतीय जनता पक्ष व पांडुरंग मामा कचरे मित्र मंडळ यांचे वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी केशव जी घोळवे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला होता. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री श्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांनी उपस्थित श्रोत्यांना संबोधित करताना इंदापूरचा सुपूत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपमहापौर होतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे कौतुक केले व तसेच त्यांच्या संघर्षशील जीवनपटावर प्रकाश टाकून बारामती मधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू असा विश्वास दिला.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री गणेश (तात्या) भेगडे यांनी आपले विचार व्यक्त करताना कामगार चळवळीतुन संघर्ष करून केशवजी घोळवे यांनी केलेला प्रवास थक्क करणारा आहे व तसेच भारतीय जनता पक्षांमध्ये जर प्रामाणिकपणे काम केले एक सामान्य कार्यकर्ता उच्चपदापर्यंत पोहचू शकतो त्याचे उदाहरण म्हणजे केशव घोळवे. तसेच  गणेशजी भेगडे यांनी मोदी सरकारने आणलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांसाठी कसे महत्वाचे आहे या विषयी आपले विचार मांडले. श्रमिक एकता महासंघाच्या वतीने श्री दिलीपराव पवार यांनी आपले विचार व्यक्त केले.बारामती भाजपचे तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग मामा कचरे यांनी आपले विचार व्यक्त करताना आपल्या मित्राची व स्वतःची कामगार चळवळीची संघर्षशील यशोगाथेचे वर्णन केले व तसेच बारामती एम आय डी सी मध्ये देखील अनेक कामगारांचे पी एफ न भरणे असंघटित असल्याचा गैरफायदा घेतला जातो कामगारांचे प्रश्न मांडताना त्रास दिला जातो परंतु आम्ही न डगमगता काम करू व भाजप कार्यकर्त्याना बरोबर घेऊन एकदिलाने काम करू असे मत व्यक्त केले.
  केशवजी घोळवे यांनी आपल्या  मनोगत व्यक्त करताना जीवनात अनेक संकट येत असतात ज्या ज्या वेळी संकट आली त्यातून संधी मिळत गेली जनतेची सेवा अविरत करत राहू हा सत्कार माझे करिता अविस्मरणीय आहे कारण तो माझ्या घराचा सत्कार आहे आपल्या वाटचालीतील अनेक संघर्षाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. या सत्कार कार्यक्रम प्रसंगी माजी सहकार मंत्री श्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री गणेशजी भेगडे,महाराष्ट्र प्रदेश भाजपा वि. निमंत्रक सदस्य श्री बाळासाहेब (तात्या) गावडे, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव पवार, अरविंद श्रोती, पुणे जिल्हा परिषद चे मा.अध्यक्ष संपतराव देवकाते,भाजपचे पुणे जिल्हा  सरचिटणीस श्री अविनाश मोटे, जिल्हा उपाध्यक्ष श्री दादासाहेब सातव, बारामती भाजपचे तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग (मामा)कचरे ,इंदापूर भाजपचे तालुकाध्यक्ष श्री शरद जामदार,भाजपचे पुणे जिल्हा सचिव तानाजी थोरात,रामभाऊ पाटील,माऊलीकाका चवरे, युवराज म्हस्के, बारामती भाजपचे शहराध्यक्ष श्री सतीश फाळके,गणेश आखाडे,भाजपचे पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री गोविंद देवकाते, बारामती भाजयुमोचे तालुकाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माने,शहरअध्यक्ष सचिन मलगुंडे, प.महाराष्ट्र सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय गायकवाड,बारामती महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अंजलीताई खजिनदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन बारामती भाजपच्या वतीने श्री पांडुरंग (मामा) कचरे यांनी केले होते. स्वागत भाषण श्री अविनाश मोटे यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप श्री गोविंद देवकाते यांनी केला.


No comments:

Post a Comment