मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ठाकरे सरकारला मोठा धक्का... नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणावरील अंतरीम स्थगिती उठवण्यास
नकार दिला. मराठा आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने हा राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय. याप्रकरणी २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होईल असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.
अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यातील नोकरभरती
रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज
स्थगितीपूर्वीची नोकरभरती करण्याची परवानगी
देखील नाकारली. यामुळे राज्यातील नोकरभरतीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडणार असून हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
No comments:
Post a Comment