ए.आर. फाऊंडेशन व जी.एस.साम्राज्य
संघटनेचा सामाजिक उपक्रम...
बारामती : बारामतीमधील शासकीय महिला
फौंडेशन व साम्राज्य संघटना बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्यापार्श्वभूमीवर महिला रुग्णालयातील रुग्णांना फळे व मास्क वाटप करण्यात आले. ए.आर. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राम गायकवाड व जी.एस.साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र धोत्रे यांच्या सहकार्यातून हा सामाजिक उपक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे रुग्णालयांमध्ये ए.आर.व मास्क वाटप करण्यात आले.या प्रसंगी ए.आर. फाऊंडेशनचे बारामती तालुक्याचे पदाधिकारी राहुल पवार, योगेश शेवाळे, किशोर पवार,निखिल लोणारी प्रतीक लालबिगे. तसेच जी.एस साम्राज्याचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र धोत्रे, रणजित नाझीरकर ,मनोज लाळगे, श्रीकांत नाझीरकर, गणेश थोरात, नीता खरात, अनिता पंजाबी,श्वेता अश्विनी सपकाळ, शीतल पवार, गौरव जाधव, प्रेम शिंदे, कृष्णा शिंदे ह्या सर्वांचे सहकार्य लाभले.तसेच जी.एस साम्राज्य संघटनेचे व ए.आर. फाउंडेशनचे पदाधिकारी व
कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment